संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२० महाराष्ट्र अध्यादेश क्र १०, दिनांक २५ जून २०२० अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार नसल्याने पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसलेल्या ग्रामपंचायतील प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५१ मधील पोट-कलम १ मध्ये खंड (क ) मध्ये तरतूद करण्यात आली आहे.
तसेच संदर्भ क्र. २ येथील शासक निर्णयाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रदान करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यासाठी योग्य व्यक्तीच्या निवडून देण्यासाठी निकर्ष व कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक (Government Circular) :
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुद्दा संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करण्यापूर्वी पुढील बाबी माननीय पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक राहील.
(The Chief Executive Officer of the Zilla Parishad will have to bring the following matters to the notice of the Hon'ble Guardian Minister before appointing a suitable person as Administrator on the Gram Panchayat where the issue has been settled in consultation with the Guardian Minister of the concerned district.)
१. प्रशासक म्हणून ज्या व्यक्तीची निवड करण्यात येईल अशी व्यक्ती त्या गावाच्या, त्या गावाच्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक राहील.
२. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांच्या प्रशासक म्हणून नियुक्त करता येणार नाही.
३. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार जे अधिकारी कर्तव्य व सरपंचास प्राप्त होते ते अधिकार व कर्तव्य प्रशासक म्हणून नियुक्त होणाऱ्या व्यक्तीची प्राप्त होतील.
४. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती प्रशासक पदाच्या कालावधी संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुज्ञेय असलेले मानधन व इतर भत्ते आहरीत करेल.
५. प्रशासक नियुक्ती ही पर्यायी व्यवस्था असल्यामुळे प्रशासकाने पद कोणत्याही प्रवर्गासाठी राखीव ठेवता येणार नाही.
६. ज्या दिवशी विधीग्राहयरित्या गठीत झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल त्या दिवसापासून प्रशासक पद व अधिकारी तात्काळ संपुष्टात येतील.

