ज्या विद्यार्थ्यांनी २०१९-२० या शैक्षाणिक वर्षासाठी मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेशअर्ज भरून विद्यापीठ शुल्क भरले आहे परंतु अभ्यासकेंद्रावर जावून प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्यता घेतलेली नाही. या विद्यार्थ्यांची विभागीय केंद्रनिहाय यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.
या यादीतील विद्यार्थ्यांनी शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर सात दिवसांच्या कालावधीत आपापल्या अभ्यासकेंद्रावर भेट देवून संबंधित केंद्रसंयोजकांकडून प्रवेश पात्रता कागदपत्राची पडताळणी आणि आपल्या प्रवेशअर्जास अभ्यासकेंद्र मान्यता घ्यायची आहे. दिलेल्या कालावधीनंतर ही प्रक्रिया अपूर्ण राहिलेले प्रवेश तांत्रिकदृष्ट्या निश्चित होणार नाहीत व अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षेस उपस्थित राहता येणार नाही. ऐन परीक्षेच्या वेळी अपूर्ण राहिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी.
अभ्यासकेंद्रांसाठी विशेष सूचना : काही तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी यादीमधील विद्यार्थ्याचे मोबाईल नंबर आणि ई-मेल वगळण्यात आले आहेत. आपणास आपल्या केंद्राच्या Approval Pending विद्यार्थ्यांचे संपर्क तपशील हवे असल्यास आपल्या अभ्यास केंद्र संकेतांक, केंद्रसंयोजकांचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवून pnson.ycmou@gmail.com या मेलवर संपर्क साधून मागणी करावी - विद्यापीठ वेबसाईट सूचना प्रमाणे

Post a Comment