Tiktok बंद काय यामुळं चीनवर परिणाम होईल का ? याचे फायदे व तोटे काय ? याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम . What is the effect of Tiktok closure on China?What are the advantages and disadvantages?Its effect on mental health.

    भारतातील समाज माध्यमात अर्थात सोशल मीडियामध्ये सुप्रसिद्ध असणारे ॲप टिक टॉक याबद्दल बरेच सकारात्मक तसेच नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे.भारतातील गलवान घाटी च्या भारत चीन संघर्षाचा बदला म्हणून चीनची आर्थिक कोंडी करण्याचा एक असफल प्रयत्न सुरू आहे पण याबद्दल नेमकं काय मानावं आणी काय नाही याबाबत सर्वच दृष्टीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहोत.

    टिकटॉक (चीन मध्ये याला ड्यूयन म्हणतात) एक चीनी व्हिडिओ सामायिकरण सोशल नेटवर्किंग सर्व्हिस आहे जी बाईटडन्स -केविन मेयर (currunt CEO) यांच्या मालकीची आहे, बीजिंग आधारित कंपनी झांग यिमिंग यांनी २०१२ मध्ये स्थापन केली होती. याचा वापर शॉर्ट डान्स, लिप-सिंक, कॉमेडी आणि टॅलेंट व्हिडिओ तयार करण्यासाठी केला जातो.२०१७ मध्ये चीनबाहेरील बाजारात आयओएस आणि अँड्रॉईडसाठी अॅप लाँच केला गेला होता. ByteDance चे निर्माते Zhang Yiming यांनी प्रथमता सप्टेंबर २०१६ मध्ये चीन बाजारात Douyin नावाने सुरू करण्ययात आले. २ ऑगस्ट, २०१८ रोजी(Musically) विलीन झाल्यानंतर ते अमेरिकेत उपलब्ध झाले. टिकटोक आणि डोयिन एकमेकांसारखेच आहेत आणि मूलत: समान अ‍ॅप, तथापि ते चीनी सेन्सरशिप प्रतिबंधांचे (नियमावली)पालन करण्यासाठी स्वतंत्र सर्व्हरवर चालतात. अनुप्रयोगाद्वारे वापरकर्त्यांना ३ ते १५ सेकंदात लघु संगीत आणि लिप-सिंक व्हिडिओ आणि ३ ते ६० सेकंदांचे लघु लूपिंग व्हिडिओ तयार करण्याची अनुमती दिली जाते. अ‍ॅप आशिया, अमेरिका आणि जगाच्या इतर भागात लोकप्रिय आहे. टिकटोक चीनमध्ये ड्युयिन म्हणून उपलब्ध आहे; त्याचे सर्व्हर अनुप्रयोग उपलब्ध असलेल्या देशांमध्ये आधारित आहेत.

दादाराव नांगरे
नॅशनल स्टुडंट्स युनियन (NSU) 

ई-मेल: nationalstudentsunionnsu@gmail.com

*Tiktok लोकप्रिय का झालं ?
-माणूस हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे जीवन जगत असताना अनेक व्यक्ती चा संबंध येत असतो त्यातूनच नात्यांची निर्मिती होते .
-मानवाचा मूळ स्वभाव आहे तो म्हणजे इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहण .यामुळे भारतात फेसबुक व्हाट्सएप तसेच अनेक समाजमाध्यम खूप लोकप्रिय झाली.
-भारतातील प्रत्येकाला फिल्मी दुनियेत रमायला आवडते. सर्वांना फिल्मी दुनिया मध्ये संधी मिळायला असं काही नाही त्यासाठी सिनेक्षेत्रातील घनिष्ठ संबंध (नेपोटीसम) असावे लागतात.
चांगले संपर्क नाहीत ,स्वतःचं निर्माण करण्यासाठी लागणार भांडवल नाही ,नेपोटीसम असे असे अनेक कारणे सांगता येतील.
-सिनेसृष्टीला अज्ञात असलेले बरेच कलाकार आज टॅलेंट च्या जीवावर मोठे करण्यात टिक टॉक चा मोठा वाटा आहे.
त्यातून ते पैसेही कमवत आहेत .
-त्यामुळे सिने स्टार सुद्धा टिक टॉक वापरताना दिसत आहेत.
-सिनेमातील तसेच इतर माध्यमावरील अनेक डायलॉग, गाण्याचे बोल तसेच music वर अनेकांना थिरकायला आवडतं त्यामुळे याची लोकप्रियता अल्पावधीतच वाढत गेली.
-भारतात लॉकडाऊन च्या काळात तर याची लोकप्रियता अजूनच वाढली कारण घरी बसून कमी वेळात मनोरंजन करणं हे सर्वांनाच आवडू लागलं.
-अनेक जण याचा उपयोग महत्वाची माहिती,विचार आणी प्रबोधन पोचवण्यासाठी सुद्धा करत होते .
-व्यवसाय चं प्रोमोशन तसेच अनेक ऍड सुद्धा यावर प्रसारित करण्यात येत होत्या .
त्यामुळेच हे भारतात लोकप्रिय झाले.

Tiktok चे फायदे काय ?
-यामुळं लोकप्रियता,प्रसिद्धी(राजकीय व व्यवसायिक) .
-टॅलेंट दाखवल्यामुळे अनेकांना संधी मिळाल्या.
-यातून पैसे सुद्धां कमवता येतात .
-मनोरंजन बरोबर विचार पोचविण्याचे सुद्धा महत्वाचं माध्यम टिक टॉक बनलं आहे.

अन तोटे काय ?
-अनेकांना टिक टॉक चे व्यसन लागले .
त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला.
-अनेक वेळा समाज विघातक व्हिडीओ मूळे सामाजिक शांतता भंग पावली.
-दोन समाजात तेढ निर्माण करणारे,भडकाउ ,धार्मिक तेढ ,जातीवाद ला चालना देणारे व्हिडीओ बनवल्या गेले त्यामुळं अनेकांना कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे लागले त्यामुळे त्यांचे आयुष्य बरबाद झाले .
-अश्लील व लहान मुलांच्या मनावर परिणाम करणाऱ्या व्हिडीओ मुळे पारिवारिक शांतता भंग पावली.
-टिक टॉक च्या नादात अनेक अपघात झालेले निदर्शनास आले आहे.
-यामुळे मोबाईल व डेटा चा अतिवापर झाला यामुळेच शारीरिक स्वास्थ्य बिघडत गेले.तसेच आर्थिक नुकसान झाले.

Tiktok सहित देशातील 59 Appliation बंद केले आहेत. त्याचा व्ययक्तिक ,सामाजिक,आर्थिक ,मानसिक ,आरोग्यविषयक गोष्टींवर काय परिणाम होणार ?
नक्कीच या सर्वच गोष्टीत खूप मोठा बदल बघायला मिळणार .
अनेक गोष्टीत सुधारणा होईल
जसे सामाजिक तेढ निर्माण करणार्यांची पोहच(reach)कमी होईल.त्यामुळं यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
-सायबर गुन्ह्यात घट होईल.
-व्ययक्तिक आयुष्यात बघितलं तर टिक टॉक स्टार यांना आर्थिक परिणाम होईल.
-आभासी आकर्षण काही प्रमाणात कमी होतील.

यामुळं चीन वर काही परिणाम होईल का
तर हो काही प्रमाणात होईल पण
-२०१८-१९ मध्ये देशातील कंपनीच्या पहिल्या पूर्ण वर्षात tiktok अर्थात बाईटेन्स इंडियाने 43.6 कोटी रुपयांची कमाई केली आणि पुढील वर्षासाठी कंपनीला १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
-भारताचा चीन सोबत असणारा व्यापार हा एवढा आहे की या ५९ अँप मुळ व्यापारावर फक्त १% परिणाम होईल .
-चीन ने भारतातील सर्व वृत्तपत्र,चॅनेल ,अँप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भारतावर सुध्दा याचा परिणाम होणार .
-सध्या भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभक्ती चा आव आणत आहे आणी हे अँप डिलीट करा असं आवाहन करत आहेत .अशांनी भारत चीन व्यापार धोरण .जागतिक व्यापार संघटनेचे करार तसेच अनेक treaty चा अभ्यास केल्यास भारत चीन वर खूप जास्त अवलंबून आहे असे जाणवते.
जर का चीन ने हात आखडता घेतला तर याचे खूप मोठे परिणाम देशाला भोगावे लागतील.
-ह्या अँप पैकी अनेकांनी भाजप ला करोडो रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत.
-देशात त्यांच्या तोडीचे अँप बनत नाही म्हणून नागरिक विदेशी तंत्रज्ञान वापरतात .
-माझी विनंती आहे की त्याच किमतीत त्या वस्तूच्या/सेवांच्या तोडीचे उत्पादन द्यावे .भारतीय लोक आपोआप विदेशी वस्तू/सेवा bycott करतील .
-याअगोदर Make in India फसली.
-आशा आहे की आत्मनिर्भर भारत यशस्वी करतील .

संकलन आणी लेखन 
दादाराव नांगरे

0/Post a Comment/Comments