रेनबो कॉम्प्युटर्स,हिंगोली (अभ्यासकेंद्र य.च.म.मु.वि) येथे विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. Rainbow Computers, Hingoli (Study Center YCMOU) The anniversary of the university was celebrated here.

YCMOU


दि. ०१ जुलै २०२० रोजी रेनबो कॉम्प्युटर्स,हिंगोली (अभ्यासकेंद्र  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक)  येथे विद्यापीठाचा  वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळेस प्रमुख पाहुणे डॉ.तुकाराम कल्याणकर, प्राचार्य.विजयकुमार कांबळे, प्रा .सुधाकर पाईकराव, नागेश अंभोरे, अंकुश देशमाने यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
rainbow computers,hingoli

English Summary
Date 01 July 2020 On Rainbow Computers, Hingoli (Study Center Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik) The anniversary of the university was celebrated here. The chief guests Dr. Tukaram Kalyankar, Principal Vijay Kumar Kamble, Prof. Sudhakar Paikrao, Nagesh Ambhore, Ankush Deshmane greeted the sculptor of Maharashtra Yashwantrao Chavan by offering a wreath.


  हुशारी, कौश्यल्य, इच्छा असतानाही काही कारणास्तव, परिस्थिती मुळे किंवा त्यावेळेस आलेल्या अडचणी मूळे शिक्षणाचे अनेकांचे स्वप्न अपुरे राहते,शिक्षण अर्धवट राहते, ज्ञान मिळविण्याची अभिलाषा, इच्छा असते अशा वय १८ पूर्ण असलेल्या अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाची गंगा त्यांच्या दारात नेऊन त्यांचे आवडीचे शिक्षण,अर्धवट राहिलेले शिक्षण, त्यांच्या सवडीने, वेळेच्या सोयीनुसार देत हे विद्यापीठ ०१ जुलै १९८९ पासून कार्य करते आहे. या विद्यापीठातून शिक्षण घेऊन माझ्यासह लाखोंनी नोकरी,व्यवसाय आणि समाजात सन्मान मिळविला आहे. या अशा लोकविद्यापीठाचा आज वर्धापन दिन या निमित्ताने माझे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यास शतशः:नमन व या विद्यापीठाचे आजपर्यंतचे सर्व कुलगुरू महोदय, कुलसचिव, संचालक,प्राध्यापक, कर्मचारी, महाराष्ट्रातील सर्व अभ्यासकेंद्र सहकारी वृन्द आणि विद्यार्थी मित्र या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. 
        Legal Life 2020  संवाद साधताना प्राचार्य.विजयकुमार कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

0/Post a Comment/Comments