‘वंचित’ लाभार्थ्यांचा कर्जमाफीच्या ‘निधी’ वितरणाबाबत महत्वाची बातमी!
राज्यात विधानसभा निवडणूकीनतर शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. या सरकारने शेतक- यांसाठी गुड न्यूज दिली आहे .
शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पुढचा टप्पा वितरित करण्यास मान्यता दिली असून त्याचा आदेश प्रसिद्ध केला आहे . महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत 2334 कोटी रुपये निधी वितरीत करण्यात सरकारने मान्यता दिली आहे . त्यामुळे राज्यभरातील तब्बल तीनलाख 53 हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचे संकट राज्यात धडकल्यानंतर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला . या पार्वभूमीवर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतक – यांनाही फटका बसला होता . मात्र आता कर्जमाफीचा उरलेला टप्पा पुन्हा पुरवला गेला आहे . शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राज्य सरकारने जाहीर केली होती . यात 20 हजार 250 कोटीची कर्जमाफी शेतक – यांसाठी करण्यात आली आहे . त्यात 30 लाख 40 हजार शेतकरी पात्र ठरले .
पहिल्या तीन टप्प्यामध्ये 19 लाख शेतकऱ्याच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे . कोरोनामुळे आर्थिक सकटात सापडल्याने सलग रक्कम देता आली नव्हती . उचरित लाख शेतकन्यांपैकी 30 जून रोजी 1 लाख 34 हजार शेतकऱ्यासाठी शासनाने रु .1050 कोटी वितरित केले आहेत .
आज उवरित 2334 कोटी रुपयाची रक्कम 3.53 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे . २ एप्रिल 2015 ते ३ मार्च 2019 पर्यंत अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या व पुनर्गठन केलेल्या अल्प मुदतीच्या पीककर्ज पतलेल्या शेतकयांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती . या योजनेचा लाभ शेतकयांना देण्यासाठी २०२०-२२ या आर्थिक वर्षासाठी 1050 कोटी निधी वितरीत करण्यात आला होता . मात्र आणखी निधी वितरीत करण्यास सरकारने मान्यता दिली आहे . कर्जमुक्ती योजनेसाठी सात हजार कोटीची तरतुद सरकारने अर्थसंकल्पात केली आहे . यातून वितरीत केलेला निथी सोडून 2234 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
ref:-https://www.esakal.com

