मोफत भरून मिळणार पिक विमा अर्ज ; शासनाचा आदेश ! Free crop insurance application; Government order!

मोफत भरून मिळणार पिक विमा अर्ज ; शासनाचा आदेश !


“ पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरून देणे शेतकऱ्यांसाठी मोफतच ” पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक शेतकरी csc केंद्र म्हणजेच Common Service Centres तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जाऊन अर्ज करतात . मात्र मागील काळ बघता या केंद्र चालकांबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी सरकारकडे प्राप्त होतात , त्यात शेतकऱ्यांकडुन पीक विमा अर्ज भरण्यासाठी सेवा शुल्काच्या नावावर पैसे घेणे तसेच झेरॉक्स व पीक विमा अर्जासाठी सुध्दा पैसे आकारणे ईत्यादी अनेक तक्रारींचा समावेश होता . शेतकऱ्यांकडुन प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेवुन शासनातर्फे सक्त निर्देश देण्यात आले असुन आता पीक विमा अर्ज भरतांना शैतकन्यांकडुन कोणतीही फी आकारू नये असे आदेश देण्यात आले आहे . शासनाकडुन दिलेल्या आदेशाचे उल्लघन करून पीक विमा अर्ज भरण्यासाठी पीक विम्याच्या हफ्त्याची रक्कम वगळता आणखी शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येणार आहे .

पीक विमा अर्ज भरतांना खालील गोष्टींचे पालन CSC केंद्र चालक तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकांना करावे लागणार आहे

पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याकडुन पीक विमा हफ्ता सोडुन इतर कोणतेही शुल्क घेवु नये , त्यात इतर शुल्कात अर्जाचा सुध्दा समावेश आहे .
शेतकऱ्यांकडुन अर्ज भरण्यासाठी घेतलेली कागदपत्रे ठळक स्कॅन करावीत .
पीक विमा अर्ज भरतांना पिकपेरा , स्वयःघोषनापत्र यावर योग्य माहिती भरलेली आहे का तसेच शेतकऱ्याची सहि आहे का हे तपासावे .
पीक विमा अर्ज करण्यासाठी आता 7/12 उतारा व 8 अ उताऱ्याची आवश्यकता नसुन हे उतारे अपलोड करावे लागणार नाहि .
पीक विमा अर्ज भरतांना संबधित शेतकऱ्याचे बँक पासबुक हे हस्तलिखीत नसावे ते प्रिंटेडच असावे . शेतकऱ्याच्या बँक पासबुक मधील नावात बदल असेल तर संबंधीत शेतकऱ्याने बैंक पासबुक मधील आपल्या नावात योग्य तो बदल केल्या नंतरच त्याचा अर्ज भरावा .
पीक विमा अर्ज भरतांना संबधीत शेतकरी समक्ष असावा तरच फॉर्म भरावा .
अर्जदाराचे शेतीचे क्षेत्र सामाईक असल्यास बॉण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र ( Affidavit ) घ्यावे व अपलोड करावे .
अर्जदाराने शेती भाडेतत्वावर कसण्यास घेतलेली असेल तर असा अर्ज भरतांना भाडेकरार ( Tenant ) सर्टिफीकेट अर्जदाराकडुन घेवुन अपलोड करावे .
अर्जदार शेतकऱ्याकडे पीक विमा अर्ज भरण्यासाठीच्या आवश्यक कागदपत्रांपैकी काहि कागदपत्रे नसतील अथवा चुकीचे असतील तर कोणत्याही परीस्थितीत असा अर्ज भरू नये .
पीक विमा अर्ज भरुन झाल्यानंतर शेतकऱ्याला अर्ज भरल्याची एक पावती प्रिंट करून द्यावी एक रेकार्ड साठी जतन करून ठेवावी
पीक विमा यशस्वीरीत्या भरलेल्या शेतकऱ्याची एका रजिस्टर मध्ये नोंदणी करावी व त्या शेतकऱ्याची त्याला पीक विमा अर्ज भरल्याबाबतची पावती दिल्याची सहि घ्यावी .
पीक विमा अर्ज भरणाऱ्या केंद्रांची होणार कृषी विभागामार्फत तपासणी

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करतात . मात्र गेल्या काही वर्षापासुन या केंद्रांमार्फत नोदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहे . यामुळे या केंद्रांची आता कृषी विभागामार्फत खालील मुद्यांबाबत तपासणी होणार आहे .

पीक वीमा योजनेच्या ऑनलाईन अर्जासाठी कोणतेही शुल्क पीक विमा हफ्त्याची रक्कम वगळता आकारले जाणार नाहि . असा फलक लावलेला आहे का ?
आपले सरकार सेवा केंद्राचे नाव , पत्ता , केंद्र चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक .
पिक विमा योजनेबाबत माहिती पत्रक केंद्राच्या दर्शनी भागात लावलेले आहे का ?
शेतकऱ्यांना पीक विमा योजने बाबत सविस्तर माहिती केंद्रामार्फत दिली जाते का ?
पीक विमा योजनेसाठी जमा करून घेतलेले अर्ज व छायांकित प्रती केंद्रामार्फत पुढील दोन वर्षे जतन करून ठेवल्या जातात का ?
पिक विमा कंपनीकडुन अर्ज अपुऱ्या माहितीमुळे नाकारल्यानंतर त्यांची पुर्तता करण्याबाबत शेतकऱ्यांना जाणीव करून दिली जाते का ?
अपुऱ्या माहितीची पुर्तता करण्यासाठी व फेर अर्ज सादर करण्याबाबत केंद्र चालकाने नियोजन केलेले आहे का ?
जिल्हा समन्वयकाने संबंधित केंद्राची तपासणी केली आहे का ?
तक्रार पुस्तीका ठेवुन शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्याबाबत कार्यवाही करण्यात येते का ? मोफत भरून मिळणार
महत्वाची माहिती

पिक विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै २०२० आहे.

योजनेसाठी भरून द्यावयाचे अर्ज व GR खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा.