हुंडा देणारे - घेणार्‍यांचा निकाह नाही. देशभरात हुंडा बंदी कायदा- १९६१ लागू आहे No Nikah Of Dowry Giver And Takers Dowry Prohibition Act-1961

कळमनुरीत शहर काजी मुफ्ती शुजआत फारुकी यांचा पुरोगामी निर्णय


   मुस्लिम धर्माचे धर्मगुरु बरेवली मरकजचे असजद रजा खान कादरी यांनी हुंडा घेणाऱ्या परिवारातील व्यक्तीचा नीकाह न लावण्या निर्णय घेतले  होता. याच निर्णयाच्या अनुषंगाने कळमनूरी शहरातही शहर काझी मुफ़्ती शुजाअत उल्लाह फारुखी बरकाती यांनी कळमनुरी परिसरात हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्या कुटुंबांच्या कुटुंबांमधील व्यक्तींचा निकाल लावण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे गरीब आणि पुरोगामी मुस्लीम समाजातून स्वागत होत आहे.

   मुळातच मुस्लिम धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठा पैसा खर्च करून बडेजाव दाखविणारा लग्न समारोप करणे व हुंडा घेणे हे गुन्हा (हराम) आहे.  त्यामुळे शहर काझी मुफ़्ती फारुखी यांनी सांगितले, की आजच्या वेळी मुलीचे लग्न म्हणजे मोठ्या प्रमाणात हुंडा देणे, मोठ्या आणि किंमती भेट वस्तू देणे, भारीचे कपडे आदीवर मुलीच्या वडिलांना मोठा खर्च करावा लागतो आणि त्यासाठी त्यांना एक- दोन वर्षांपासूनच तयारी सुद्धा करावी लागते. कधी तर घर विकुन किंवा कर्ज घेऊन मुलींचे लग्न करण्यात येते व संपूर्ण आयुष्य कर्ज भरण्यामध्ये निघुन जाते. तसेच ज्याना अधिक मुली असल्यास त्यांचे तर आयुष्यच उद्ध्वस्त होते आणि मुलीचे लग्न कसे करावे या चिंतेत वधुपिता फार खंगून जात असतो. (Due to Covid-19 many restrictions applied to marriage ceremonies)   या सर्व बाबींचा विचार करता आणि सध्या कोरोना रोगाचा पादुर्भाव लक्षात घेता, शासनाने सुद्धा मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थिती मध्येच लग्न समारोप करण्याचे आदेश दिले आहेत.

   सध्या श्रीमंत ते गरीब अशा सर्वच घरातील लग्न समारोप आगदी साध्या पद्धतीने होत आहेत.  त्यामुळे यापुढे पण असल्यास प्रकारेच लग्न समारोप व्हावेत, हुंडा पद्धतच रद्द व्हावी यासाठी यासाठी प्रयत्न व्हावेत आणि पैग़म्बर मोहम्मद (Prophet Mohammad Teachings And Preachings) यांच्या आदेशाचे कडेकोडपणे पालन व्हावे यासाठी शहर काझी यांनी हा निर्णय घेतला आहे. (Dowry Prohibition Act-1961) देशभरात हुंडा बंदी कायदा- १९६१ लागू आहे. त्यात हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांना ६ महिन्यांपेक्षा कमी शिक्षा नाही, ती ५ वर्षांपर्यंत होवू शकते (What's punishment for dowry harassment?). हुंडाबळी होण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामध्ये वधू पिता मुलीच्या लग्नात मोठा खर्च करतो आणि नंतर त्याच्यावर मुलीचा मृतदेह पाहण्याची सुद्धा वेळ येते.
ref - mahademocrat

अवाजवी खर्च नको, धर्माचे पालन झाले पाहिजे म्हणून निर्णय..
मुस्लिम धर्मामध्ये साखरपुडा, लग्न समारोप आगदी साध्या पध्दतीने करण्याचे आदेश आहेत.वर पक्षाकडून मोठ्या प्रमाणात वधु पक्षाकड़े वस्तुची मागणी व हुंडा लग्नाच्या अगोदर मागणी करत असतात. असल्या प्रकाराला दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाचे पैगम्बर मोहम्मद यांच्या आदेशाचे पालन करण्याचा हा मार्ग असून त्यावर चालून एक आदर्श घालण्याची संधी आहे. मुस्लिम समाजाने आणि विशेषतः तरुण मंडळींनी या चांगल्या कामासाठी पुढाकार घेऊन स्वतः हुंडा देणार नाही आणि घेणार नाही अशी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. आणि अशा तरुणांची आम्ही स्वागतच करू.शहर काझी मुफ़्ती शुजाअत उल्लाह फारुखी