शेतकरी कर्जमाफी पुन्हा सुरु नवीन GR आला ! Farmer loan waiver resumed with new GR

खुशखबर; शेतकरी कर्जमाफी पुन्हा सुरु नवीन GR आला !
शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा महत्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे शेतकरी कर्ज माफीसाठी निधी उपलब्ध करून देणारा शासन निर्णय आहे . आपण पाहिलेलं आहे की जवळ जवळ 19 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही कर्ज माफीची रक्कम जमा करण्यात आलेली होती.
मात्र या शेतकरी कर्जमाफी मध्ये 11 लक्ष शेतकरी हे पात्र असून देखील त्यांची कर्ज माफी होणे बाकी आहे. आणि याच्यासाठी निधी उपलब्ध न्हवता तरी अशा पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज माफी देखील प्रकाशित झालेल्या आहेत. आणि अशा पात्र शेतकऱ्यांना साठी जवळ जवळ 7 हजार ते 8 हजार कोटींच्या निधीची आवश्यकता तर याच पात्र शेतकऱ्यांच आधारप्रमाणिकरण सुद्धा झालेलं आहे.
मात्र निधी उपलब्ध नसल्यामुळे हे शेतकरी कर्जमाफीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होण्याच्या प्रतीक्षेत होते कारण ही रक्कम जमा न झाल्यामुळे बँका नवीन कर्ज द्यायला टाळत होते तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे
काय आहे शासन निर्णय आणि कसा होणार निधी उपलब्ध ते आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून पाहू
प्रस्तावना :
दि .१.४.२०१५ ते दि . ३१.३.२०१ ९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या , तसेच  या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन केलेल्या शेतक – यांना दिलासा देण्यासाठी “ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१ ९ ” ही कर्जमुक्ती योजना संदर्भ क्र .१ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली आहे . सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना तातडीने दयावयाचा आहे . सदर प्रयोजनासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
१) ” महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१ ९- ( २४३५ ०१४२ ) ” या योजनेअंतर्गत सन २०२०-२१ साठी रु .७,००० कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे . सदर निधीतून रु .१,०५० कोटी ( रुपये एक हजार पन्नास कोटी ) इतका निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .
२) सदर तरतूद खर्च करण्यासाठी ( V0004 ) सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक ( अंदाज व नियोजन ) , सहकार आयुक्त कार्यालय , महाराष्ट्र राज्य , पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे . तसेच लेखाधिकारी , अधिन सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , पुणे यांना आहरण संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे . सदर निधी आहरण करुन हा खर्च वेळेत होईल हे सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , पुणे यांनी पहावे , तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी
३) सदरहू रक्कम मागणी क्र . व्ही -०२ , मुख्य लेखाशिर्ष “ २४३५– इतर कृषिविषयक कार्यक्रम , ६० – इतर , १०१ — शेतक – यांसाठी कर्ज माफी योजना , ( 00 ) ( ०३ ) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०१ ९ ( राज्य स्तर ) ( कार्यक्रम ) , ( २४३५ ०१४२ ) -३३ अर्थसहाय्य ” या लेखाशिर्षाखालील सन २०२०-२१ या वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून खर्च करण्यात यावी .
४) शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण -०६२० / प्र.क्र .७५ / २ – स सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक १८५ / २०२० / व्यय -२ , दि .३०.६.२०२० अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे .
५) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या  http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२००६३०१४०५३८५३०२ असा आहे . हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे . महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने .
GR सरकारी प्रत पाहण्यासाठी खालील लिंकवर पहा